shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपळगाव माळवी पंपिंग स्टेशन मधील साहित्य चोरी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 रविवार दिनांक १२ जून २०२२

पिंपळगाव माळवी पंपिंग स्टेशन मधील साहित्य चोरी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल..!!

अहमदनगर : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलाव परिसरात असलेल्या महापालिका मालकीच्या पंपिंग स्टेशन येथून विद्युत पंप व इतर साहित्याची चोरी झाली होती. या चोरीच्या घटनेनंतर तब्बल २२ दिवसांनी महापालिका प्रशासनाने शुक्रवारी (दि.१०) रात्री उशिरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महापालिकेचे अभियंता रोहिदास सातपुते यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पिंपळगाव तलावाचे सुमारे ७०० एकर क्षेत्र महापालिकेच्या नावावर आहे. मागील महिन्यात येथील वृक्षांची तोड करून वनसंपदेचे मोठे नुकसान करण्यात आले होते. नुकसान करणाऱ्यांवर १२६ वृक्षांची तोड केल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दरम्यान दि.१९ मे रोजी तेथील पंपिंग स्टेशन येथून विद्युत पंप व इतर अनेक साहित्यांची मोठ्या प्रमाणात चोरी झाली होती.. त्या घटनेचा पंचनामा देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला होता. परंतु या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता. या प्रकरणी महापालिकेने तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवप्रहार संघटनेचे युवक तालुका प्रमुख गोरख आढाव यांनी केली होती.
 
त्यावेळी असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता प्रदीप ढगे यांनी पिंपळगाव माळवी तलाव परिसरात असलेल्या महापालिका मालकीच्या पंपिंग स्टेशन येथून काही साहित्य चोरीला गेलेले आहे. त्याची पाहणी करण्यात आली असून त्या ठिकाणी यापूर्वी काय काय होते व आता काय शिल्लक आहे, याची तपासणी केली जात आहे. नेमके कोणते साहित्य चोरीला गेले याची लिस्ट तयार करण्यात येत असून याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठीचा प्रस्ताव मंजुरी साठी आयुक्तांपुढे ठेवण्यात आलेला आहे. आयुक्तांची मंजुरी आणि चोरीला गेलेल्या साहित्याची लिस्ट तयार होताच पोलिस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली जाणार असल्याचे सांगितले होते.

या प्रस्तावास आयुक्तांनी गुरुवारी (दि.९) मंजुरी दिल्या नंतर अभियंता रोहिदास सातपुते यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि.१०) रात्री फिर्याद दिली. या ठिकाणी असलेले २ वीज पंप, २ छोटे पंप, पंपाची झाकणे, मिक्सर पंप आदी साहित्य चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close