shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यश्लोक आहिल्यादेविंची जयंती प्रतेक घरात सण म्हणून साजरी व्हावी-नानासाहेब खरात

पुण्यश्लोक आहिल्यादेविंची जयंती प्रतेक घरात सण म्हणून साजरी व्हावी-नानासाहेब खरात

खोरोची येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी. 
इंदापूर प्रतिनिधी: पुण्यश्लोक आहिल्यादेविंची जयंती प्रतेक घरात सण म्हणून साजरी व्हावी असे तेजपृथ्वी ग्रुपचे संस्थापक नानासाहेब खरात यांनी खोरोची येथे २  जुन रोजी  अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले होते यावेळी प्रास्ताविक भाषणात आपले मनोगत व्यक्त केले. 
यावेळी गजी ढोल  वादन,  सह्याद्री अकॅडमीचे  आनंद रुपनवर यांचे अहिल्यादेवी  होळकर यांच्या जीवनावर  व्याख्यान तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची गावातून अहिल्यादेवींचा जयघोष भंडाऱ्याची  उधळण करीत विविध वाद्यसुरात  अहिल्यादेवी  होळकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.

 
  या कार्यक्रमास डॉ. शशिकांत तरंगे ,हेमंत वाघमोडे , सपंत सरक ,सोमेश्वर वाघमोडे ,दादा भाळे, दिलीप वाघमोडे ,रामभाऊ खरात ,संतोष तरंगे ,सुहास वाघमोडे, शिवाजी खरात, दया वाघमोडे, देवकाते ,पोपट पांढरे, दुर्योधन पाटील, हनुमंत कुलाळ तसेच गावातील युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
या  कार्यक्रमाचे प्रास्ताविक नानासाहेब खरात यांनी  तर आभार महेश भिसे यांनी मानले.
close