शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक २४ जून २०२२
अधिकारी व ठेकेदाराच्या ऑडिओ क्लिपमुळे विद्यापीठ परिसरात खळबळ..!!
अभियंत्याच्या व राहुरीतील एका विद्युत ठेकेदार यांच्या सोबत झालेली संभाषणाची ऑडिओ क्लिप विद्यापीठ वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल.
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बांधकाम शाखेमध्ये असलेल्या एका अभियंत्याच्या व राहुरीतील एका विद्युत ठेकेदार यांच्या सोबत झालेली संभाषणाची ऑडिओ क्लिप विद्यापीठ वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून यातील संभाषणामुळे अधिकारी व ठेकेदार कोण ही चर्चा रंगली आहे.
या क्लिपमधील अभियंता ठेकेदारास पन्नास हजार रुपयाची मागणी करताना दिसून येत आहे, तसेच यापूर्वी झालेल्या सर्व व्यवहारांची चर्चा करतांनाचा संवाद ऐकू येत आहे. हे पन्नास हजार हळूहळू येणाऱ्या फाईलमध्ये ऍडजस्ट करू असेही यात उल्लेख आहे.
या क्लिपमुळे विद्यापीठ अभियंता कार्यालयात सुरू असलेला काळाबाजार पुन्हा एकदा समोर आलेला आहे. आता या क्लिप चे पुढे काय होणार ? विद्यापीठाचे विद्यापीठ अभियंता, कुलसचिव व कुलगुरू यावर काय कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

