shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाडीकुरोलीच्या प्रीती काळे ची खेलो - इंडिया खो - खो स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण कामगिरी


प्रतिनिधी : सुर्यकांत होनप

 वाडीकुरोली : १३ /  पंचकुल  - हरियाणा येथे सुरू असलेल्या ४ थ्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत पंढरपुर तालुक्यातील वाडीकुरोली येथील अष्टपैलू खेळाडू प्रीती अशोक काळे हिला सुवर्णपदक मिळाले आहे.


प्रीती काळे ही वसंतराव काळे शैक्षणिक संकुल वाडीकुरोली येथील कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबची खेळाडू असून महाराष्ट्र संघाकडून खेळताना तिने अंतिम सामन्यामध्ये ओडिसा विरूद्ध खेळताना २ गडी बाद केले व संरक्षण करताना १.४० व २.४२ अशी उल्लेखनीय कामगिरी करून महाराष्ट्र संघाच्या विजयांमध्ये अष्टपैलू कामगिरी करून हे यश मिळाले आहे.

पंचकुल - हरियाणा येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिसाचा एक गुणाने पराभव करून सुवर्णपदक पटकावले. क्रीडाशिक्षक प्रा. संतोष पाटील प्रशिक्षक अतुल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

 तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. कल्याणरावजी काळे साहेब , महाराष्ट्र खो-खो असोशिएशनचे उपाध्यक्ष मा. महेशजी गादेकर साहेब, उपसंचालक मा. अनिलजी चोरमले साहेब , सचिव मा. बाळासाहेब काळे गुरूजी , भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव मा. चंद्रजीत जाधव साहेब , महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे मा. सचिव संदिपजी तावडे साहेब , सचिव मा.  गोविंदजी शर्मा सर , शिवछत्रपती पुरस्कार विजेते मा.श्रीकांतजी ढेपे साहेब , कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष मा.समाधानदादा काळे , संस्थेच्या संचालिका व क्लबच्या मार्गदर्शिका मा.सौ. संगिताताई काळे वहिनीसाहेब , मार्गदर्शक मा. विलासराव काळे साहेब , युवानेते मा. यशदादा काळे ,  प्राचार्य मा. दादासो खरात , किसन कांबळे करमाळा तालुकाध्यक्ष मागासवर्गीय शिक्षक संघटना संजयकुमार राजे घोरपडे करमाळा तालुकाध्यक्ष माध्यमिक विभाग मागासवर्गीय शिक्षक संघटना मा .पर्यवेक्षक मा. एस.ए. काळे , वसंतराव काळे शैक्षणिक संकुलातील प्राचार्य , मुख्याध्यापक , प्राध्यापक-प्राध्यापिका , शिक्षक - शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनींनी अभिनंदन केले आहे.
close