चिंचवड (पुणे):-
जी एस टी परताव्याची अत्यंत गरज असताना
करोना सारख्या महा भयंकर परिस्थिती मध्ये ही परतवा केंद्र सरकार कडून मिळाला नाही, तेव्हा याची गरज महाराष्ट्रातील जनतेला होती,महाराष्ट्र सरकारने सतत पाठपुरावा करून महाराष्ट्र सरकार यश आले आणि तो परतवा मिळाला,आता महाराष्ट्रामधील जनतेला आता याची खरच अत्यंत गरज या परताव्या मधून योग्य ते नियोजन करून आपण पेट्रोल व डिझेल वारील 50 % कर कमी करून जनतेला न्याय द्यावा,पेट्रोल व डिझेल वरील थोडे कर कमी करून महाराष्ट्र सरकारने थोडासा दिलासा दिला आहे.
पण आजून ही पेट्रोल व डिझेल वरील भाव बाकी राज्य पेक्षा जास्त आहेत.अशी मागणी भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे अजित संचेती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या कडे निवेदना मार्फत केली आहे.

