shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडिलांचे क्रियाकर्म आटोपून जात असताना काळाचा घाला !



केज-अंबाजोगाई रोडवर भीषण अपघात !

अपघातात चार ठार तर पाच पेक्षा जास्त जखमी

घटनास्थळी उपजिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार आणि सहायतक पोलीस निरीक्षक यांची भेट

प्रकाश मुंडे बीड जिल्हा प्रतिनिधि :-                        वडीलांच्या मृत्यू नंतर सावडण्याच्या कार्यक्रम आटोपून आंबेजोगाईकडे जात असलेल्या रिक्षाला एका भरधाव वेगात येणाऱ्या इनोव्हा कारने जोरदार धडक दिल्याने रिक्षातील तीन प्रवासी व रिक्षा चालकासह चौघांचा मृत्यू झाला आहे. तर पाच प्रवासी जखमी झाले आहेत.




या बाबतची माहिती अशी की,  दि. २ जून गुरुवार रोजी केज येथील धारूर रोड जवळील भवानी माळ वस्तीवर राहत असलेले शिकलकरी समाजातील  नागरिक हे त्यांच्या समाजातील चरणसिंग गोके यांच्या अंत्यविधी नंतरचे क्रियाकर्मचा कार्यक्रम आटोपून सायंकाळी ५:०० वा च्या दरम्यान अंबाजोगाईकडे रिक्षा क्र. (एम एच-२३/एक्स-५२२९) जात असताना चंदनसावरगाव ते होळच्या दरम्यान होळ शिवारातील गोसाव्याचे शेत नावाने ओळखल्या जात असलेल्या शेता जवळ अंबाजोगाई कडून येणाऱ्या एका भरधाव वेगतील इनोव्हा गाडीने क्र. (एम एच १६/सी एन-७००) या गाडीने जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भयानक होता की, रिक्षाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या आणि रिक्षातील मच्छिंद्रसिंग ग्यानसिंग गोके, प्रिया दीपकसिंग गोके, वीरसिंग दीपकसिंग गोके रा. केज आणि रिक्षा चालक बालाजी मुंडे रा. पिसेगाव हे चारजण जागीच ठार झाले तर हरजितसिंग बादलसिंग टाक, चंदाबाई बादलसिंग टाक, मालासिंग दुर्गासिंग रा. जालना आणि दीपकसिंग मच्छिंद्रसिंग गोके, गोविंदसिंग मच्छिंद्रसिंग गोके रा. भवानी नगर केज हे पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अंबाजोगाई} येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत.


close