shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आ. बंटी भांगडीयांच्या उपस्थितीत तालुका क्रीडा संकुल कार्यकारी समितीची आढावा बैठक संपन्न!

चंद्रपूर▪️किरण घाटे जि.प्र.▪️

चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांच्या अध्यक्षतेखाली नागभीड तहसीलदार  यांच्या दालनात तालुका क्रीडा संकुल कार्यकारी समिती नागभीडची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली.





   

सदरहु बैठकीमध्ये क्रीडा संकुलातील विविध विकासकामे आणि समस्यां संदर्भात प्रशासकीय अधिकारी व कार्य समिती सदस्य यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करून विकासकामांचा आढावा घेण्यात आला व सकारात्मक कार्यवाही करीता संबंधित प्रशासनाला सुचना करण्यात आल्या.


या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोषभाऊ रडके, सभापती कृ.ऊ.बा. समिती नागभीड आवेश पठाण, बांधकाम सभापती न.प. नागभीड सचिन आकुलवार, जयंत गौरकार आनंद कोरे, सोनू नुरानी, रामदास बाहेकर, तहसीलदार मनोहर चौव्हान, अति. जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर अविनाश पुंड, मुख्याधिकारी न.प. नागभीड राहुल कंकाळ, गटविकास अधिकारी नागभीड प्रणाली खोचरे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जनार्धन रामटेके, गटशिक्षणाधिकारी नागभीड चिलबुले, पोलीस निरीक्षक मडावी, तालुका क्रीडा संयोजक श्रीकांत जाधव व तालुक्यातील क्रीडा विभागाचे अधिकारी, तालुका क्रीडा संकुल कार्यकारी समिती नागभीडचे सदस्य उपस्थित होते.

close