चंद्रपूर-▪️ किरण घाटे▪️
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत गावगाडा साहित्य पुरस्कार या नावाने अनेक दिग्गज साहित्यिकांना पुरस्कार दिला जातो.या शिवाय विविध भागातील कवयित्री आणि कवींना बोलवून काव्य मैफिल आयोजित केली जाते.सोलापूर जिल्ह्यातील विश्वकर्मा तरूण मंडळ वडशिवने यांचे वतीने नुकताच किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियन हॉल डहाणूकर कॉलनी कोथरूड पुणे लेन नंबर- 3 येथे पुरस्कार वितरण सोहळा व काव्य मैफिलचा कार्यक्रम उत्साहात व थाटात पार पडला.
◼️ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रख्यात पुरस्कृत तसेच वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर पाचवडच्या कवयित्री कु. अर्चना दिलीप सुतार यांची या कार्यक्रमास निमंत्रित म्हणून प्रमुख उपस्थिती होती. त्यांना निमंत्रित कवयित्री म्हणून ही आमंत्रित केले होते. कार्यक्रमात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुतार यांनी या प्रसंगी स्वरचित रचना "माझा श्वास" ही कविता गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. श्रोत्यांनी ही त्यांचे कवितेला चांगलाच प्रतिसाद दिला.आजपावतो अनेक व्यासपीठे गाजवलेल्या तदवतचं राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेल्या व वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या कवयित्री अर्चना सुतार यांच्या बरोबर चाहत्यांना छायाचित्रे काढण्याचा मोह या वेळी टाळता आला नाही. सदरहु कार्यक्रमाला साहित्य वितरणाचे अध्यक्ष पार्थ पोळके सातारा, स्वागताध्यक्ष रवींद्र रायकर, प्रामुख्याने उपस्थित होते .या शिवाय हनुमंत दादा पांचाळ, डा. प्रदीप कुमार आवटे, गणपतराव गायकवाड, अशोक आनंदे, किशोर कदम, सागर जानेराव, बाळासाहेब खंडागळे, सुरेखा गाडे, निर्मला रायरीकर, कुमारी अर्चना सुतार, मुग्धाताई भालेकर, दत्तात्रय सुतार (संस्थापक अध्यक्ष)सुनील पाटणे, मेघा गरुड यांची उपस्थिती लाभली होती. काव्य मैफिलसाठी अध्यक्ष कामगार भूषण कवी राजेंद्र वाघ, कवयित्री अर्चना सुतार, बबन धुमाळ, स्मिता धारूरकर यांचेसह कार्यक्रमाचे संयोजक सोमनाथ टकले व इत्तर मान्यवर मंडळी उपस्थित होती . ◼️जगविख्यात कवयित्री अर्चना दिलीप सुतार या महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं काव्यकुंजचा सदस्या आहे हे विशेष!



