shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र राज्य माळी समाजातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक होणार शनिवारी.

महाराष्ट्र राज्य माळी समाजातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक होणार शनिवारी.

- पुणे येथील बैठकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ही समाज बांधव व पदाधिकारी उपस्थित राहणार 

- बैठकीत समाजातील विविध विषयावर होणार चर्चा .
     
     इंदापूर प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्य माळी समाजातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक शनिवार
 दि.४ जून २०२२ रोजी दुपारी १२ वाजता तळेगाव ढमढेरे येथे जेष्ठ संजयजी जकाते साहेब यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीसाठी माळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय समाज कार्य करणाऱ्या प्रमुख पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.या बैठकीत माळी समाजातील तळेगाव ढमढेरे येथील नंदाताई भुजबळ यांची महा ऑरगॅनिक ॲन्ड रेश्युड्यु फ्री फार्मर्स असोसिएशन च्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.त्याबरोबरच बैठकीत ओबीसी आरक्षण, पुणे येथील भिडे वाड्याच्या प्रलंबित विषयवार चर्चा होणार आहे तरी या बैठकीला संपूर्ण महाराष्ट्रातून माळी समाजातील प्रमुख पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित रहाणार आहेत.या पार्श्वभूमीवर आज सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व समाज बांधव यांची मिटींग सांगोला या ठिकाणी पार पडली.
        या बैठकीला मुंबई हाय कोर्ट चे ॲड.नितीनजी राजगुरू, नानासाहेब ननवरे ,महेश भाऊ गोरे,  रूपाली ताई रायकर, बापूसाहेब बोराटे, संजय जकाते, ज्ञानदेव शिंदे, मुरलीधर भुजबळ, राजेंद्र गोरे, बंडू जाधव,विधाते साहेब,भारतीताई आल्हाट,प्रितम खेरडे, धनंजय जाधव, गणेश ताजणे,नंदाताई भुजबळ, गणेश गायकवाड, स्वप्नाताई लोणकर,मनोज गुंजाळ, सुरेखा ताई होले, कविता ताई जकाते, वैशाली सिनलकर, वर्षाताई भोंग, सीमाताई पांढरे, बाळासाहेब झगडे,उमेश गायकवाड,  शंकर झगडे, महेश बनकर,  महेश शिंदे, प्रकाश माळी,संतोष झुरंगे, संतोष माळी, आदी पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित रहाणार असल्याची माहिती संजय जकाते, ज्ञानदेव शिंदे, ॲड.नितीन राजगुरू यांनी दिली.
      या पुर्वनियोजन बैठकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ॲड, बंडू जाधव, दादा माळी,अनिकेत अदलिंगे, अतुल ननवरे, गणेश म्हेत्रे, प्रदिप देवकर, सुनिल जाधव,सुशीलकुमार शिंदे, सौरभ लिंगे, गजानन जाधव,शंकर जाधव, चंद्रकांत माळी,विठ्ठल माळी, विक्रम माळी,मसुराज राऊत, दशरथ राऊत,पोपट गायकवाड,राहूल वसेकर, राजु जाधव, प्रभात जाधव, अविनाश जाधव,शामराव जाधव,ॲड चैत्राजा बनकर, ॲड व्ही पी बनकर,अंकुश नवले,रोहन नवले  याबरोबरच इतर समाज बांधव उपस्थित होते.
close