shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सन २०२२ च्या पोलिस भरतीत "त्या" कालावधीतील वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांना संधी द्या !विशाल राठोड यांची मागणी !



चंद्रपूर-◼️किरण घाटे-◼️

१८ डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ मध्ये ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपलेली आहे .अश्या विद्यार्थ्यांना सन २०२२ च्या पोलिस भरतीत संधी देण्यात यावी .अशी मागणी जय विदर्भ पार्टीचे नेते सुदाम राठोड यांनी केली आहे.






दरम्यान जय विदर्भ पार्टीचे नेते सुदाम राठोड यांनी या विद्यार्थ्यांची दखल घेत जिवतीचे तहसीलदार  यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना एका निवेदनाद्वारे विंनती केली आहे .सन २०२२ च्या पोलीस भरती मध्ये शासन निर्णयानुसार सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळेल अशी माफक अपेक्षा देखिल त्यांनी या निवेदनातुन व्यक्त केली आहे .०१ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ पर्यंतचा शासन निर्णय तात्काळ रद्द करून १८ डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ मध्ये वयोमर्यादा संपलेल्या सर्व विद्यार्थ्यांना २०२२ च्या पोलीस भरतीमध्ये प्रवेश मिळवून द्याल असे सुध्दा राठोड यांनी निवेदनात म्हटले आहे.  उपरोक्त  मागणीची पूर्तता न झाल्यास जय विदर्भ पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा ही याच निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन सादर करतांना जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड, सोशल मीडिया चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विशाल राठोड, जय विदर्भ पार्टी जिवती तालुकाध्यक्ष रियाजभाई सय्यद, युवा आघाडी जिवती तालुकाध्यक्ष रामेश्वर पोले,सामाजिक कार्यकर्ता भारत चव्हाण आदीं उपस्थित होते.

close