प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
केज येथील राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या चौकाचे जयंती पुर्वी सुशोभिकरण करून चौकाचे वैभव वाढवावे अशी रास्त मागणी केज शहर व तालुक्यातील युवकांनी तसेच भगवान बाबा भक्तांनी केज नगरपंचायत कडे निवेदना द्वारे केली आहे.
चौकाची पुनर्निर्मिती बांधकाम व नूतनीकरण करण्यासाठी आज नगरपंचायत कार्यालय केज यांना निवेदन देले. व पुढील महिन्यांमध्ये राष्ट्रसंत श्री भगवान बाबांची जयंती आहे त्याआधी चौकाचे नूतनीकरण करण्याची विनंती केली आहे .निवेदन देताना अक्षय राजेंद्र गिते, विशाल मुंडे, संदीप सोनवणे, प्रदीप घुले, कृष्णा बिक्कड, कृष्णा नागरगोजे, अमोल ठोंबरे, संतोष चौरे, विकास मुंडे, विकास सांगळे, गोविंद नेहरकर, प्रमोद गायकवाड, विश्वजीत बारगजे, संजय घुले, अशोक मुंडे यासोबत सर्व समाज बांधव उपस्थित होते. नगरपंचायत प्रशासन , नेते हारूनभाई इनामदार व सिताताई बनसोड योग्य पावले उचलुन राष्ट्रसंत श्री भगवान बाबा चौकाचे सुशोभिकरण करून योग्य न्याय देतील हीच सर्व भक्तांना अशा लागली आहे .व विश्वास देखील आहे.



