shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आ.प्रकाश सोळंके यांच्या पत्नी, मुलाच्या नावे असलेल्या हॉस्पिटल इमारतीचे बांधकाम अनधिकृत..!


नगर विकास खात्यामार्फत केलेल्या चौकशीतून झाले निष्पन्न..!!
----------------------------------------------- 
मुख्याधिकारी विशाल भोसलेही आढळले दोषी.
-----------------------------------------------   

प्रकाश मुंडे  | बीड जिल्हा प्रतिनिधि  :- 
माजलगाव शहरातील मोक्याच्या जागी असणाऱ्या सर्वे नंबर ३७२ मध्ये रत्नसुंदर मेमोरियल हॉस्पिटल इमारतीचे बांधकाम अनधिकृत असल्याचे उपविभागीय अधिकारी माजलगाव यांच्या चौकशीतून सिद्ध झाले.या प्रकरणात मुख्याधिकारी विशाल भोसले दोषी असल्याचे निष्पन्न झाले आहे.हा अहवाल जिल्हाधिकारी बीड यांना पाठवला असल्याचे तक्रारदार पत्रकार सुभाष नाकलगावकर यांनी सांगितले.
     



यावेळी पत्रकारांना माहिती सांगताना नाकलगावकर म्हणाले कि,शहरातून जाणाऱ्या बायपास रोड लगत सर्वे नंबर ३७२ या ठिकाणी आ.प्रकाश सोळंके यांचे पुत्र पृथ्वीराज प्रकाश सोळंके व रामेश्वर  टवाणी यांच्या भागीदारीत एक एक्कर जागेत रत्नसुंदर मेमोरियल हॉस्पिटलचे बांधकाम सुरू आहे.सदरील हॉस्पिटल हे आ.प्रकाश सोळंके यांच्या सौभाग्यवती मंगलबाई प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव विकास प्रतिष्ठानचे आहे.बांधकाम  परवानाही याच नावाने आहे.मात्र नगरपरिषद परवाना कर पावत्या आमदार पुत्र पृथ्वीराज सोळके यांच्या नावाने फाडण्यात आल्या आहेत.वास्तविक पाहता पृथ्वीराज प्रकाश सोळके यांच्या मालकीची जागा प्रथम माजलगाव विकास प्रतिष्ठानला भाडेपत्र,लीज, करारनामा करणे आवश्यक होते. परंतु याठिकाणी अशी कुठलीही कायदेशीर प्रक्रिया न करता संबंधित जागेच्या नामांतरा आगोदर पाच महिन्यापूर्वीच बांधकाम परवाना देण्यात आला आहे.या जागेचे मालक पृथ्वीराज प्रकाश सोळंके व रामेश्वर टवाणी यांची नगरपरिषदेला नामांतर करण्याच्या प्रक्रियेत(पिटीआर) सावळा गोंधळ केला आहे.तसेच आ.प्रकाश सोळंके यांच्या सौभाग्यवती सौ. मंगलबाई सोळंके यांनी ३६८ सर्वे नंबर मधील २२ आर जागा रमेश ज्ञानोबा सोळंके यांना विक्री केल्यानंतर अनधिकृतपणे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी पुन्हा मंगलबाई सोळंके यांचे नाव पीटीआर ला लावले.


सदरील बाब गंभीर असून मी ती नगर विकास खात्याचे प्रधान सचिव व राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे तक्रार करून निदर्शनास आणून दिली.त्यानुसार नगर विकास खात्याचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी १० फेब्रुवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी बीड यांना सदर तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून चौकशी अहवाल सादर करण्याचे कळविणे. जिल्हाधिकारी बीड यांनी  मुख्याधिकारी विशाल भोसले यांना तक्रारीच्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. विशाल भोसले यांनी दिलेला अहवाल  असमाधान कारक असल्याने जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी पुन्हा माजलगाव उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांना  चौकशी करून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेशीत केले होते.यावर उपविभागीय अधिकारी माजलगाव यांनी २०२०/संकीर्ण/न.प.मु.अ. चौकशी/कावी१४८ दि.१८ मे. २०२२ रोजी बारा पानी अहवाल सादर केला.सदरील अहवालामध्ये  तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली.यावेळी तक्रारीतील मुद्दा क्रमांक १,२,५ मध्ये चौकशीअंती तथ्य असल्याचे निदर्शनात येते.आसे चौकशी अहवालात नमुद केले. या अहवालावरून आ.प्रकाश सोळंके यांच्या पुत्राच्या नावाने सुरू असलेल्या हॉस्पिटल इमारतीचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सिद्ध झाले आहे.

या प्रकरणात मुख्याधिकारी विशाल भोसलेही दोषी असल्याचे समोर येत आहे. संबंधित अहवालाने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या वृत्तीला लगाम बसणार असल्याचेही नाकलगावकर म्हणाले.सदरील अहवालाने तालुक्यात खळबळ माजली आहे.
close