प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : १३ / मुंबई येथे शासकीय विश्रामगृहावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा . ना . रामदासजी आठवले साहेब यांची नगर जिल्हयातील काही मान्यवरांनी सदिच्छा भेट घेतली .
यावेळी ना .रामदासजी आठवले यांना सर्वांच्या वतीने पुष्पगुच्छ देण्यात आला . तसेच त्यांचेबरोबर नगरच्या युवकांनी चर्चाही केली .
या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शशिकांत पाटील, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, कर्जत तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजा जगताप, पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, रविंद्र दामोदरे आदी उपस्थित होते .

