shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कवी मनोहर पवार शाहिरी कला गौरव पुरस्काराने सन्मानित !

 चंद्रपूर◼️-किरण घाटे-◼️                                  

चिखली येथील शाहिर कवी साहित्यिक मनोहर पवार यांना पहिल्या  अखिल भारतीय साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते शाहिर कला गौरव  पुरस्कार गोवा - पणजी येथे नुकताच देण्यात आला .



▪️प्रागतिक विचार मंच गोवा पणजी आणि शिवचरण उज्जैनन्कर फाऊंडेशन मुकाईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पहिल्या अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन कविवर्य बा भ . बोरकर साहित्य नगरी बोरी - फोंडा गोवा या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते . या संमेलनात अनेकांना  विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले त्यात केळवद येथील शाहिर मनोहर पवार यांना या वर्षाचा ' उत्कृष्ठ शाहिरी कला पुरस्कार ' मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . संमेलनाध्यक्ष  लिला शिंदे ' शा .म .प्रभुदेसाई ' सुनिल सावकार ,जयवंत आडवईकर ,प्रकाश तळवडेकर आणि  शिवचरण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या हस्ते व मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत हा कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला . या वेळी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांतील व गोव्यातील साहित्यिक हजर होते . मनोहर पवार हे साहित्य क्षेत्रात अग्रेसर असून महाराष्ट्रात व राज्याबाहेर विविध साहित्य संमेलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. विविध पुरस्कारांनी त्यांना या पूर्वी गौरविण्यात आले आहे . कविवर्य बा भ . बोरकर यांच्या गावी मला पुरस्कार मिळाला हे माझे भाग्य समजतो असे त्यांनी या वेळी बोलताना म्हटले .

close