प्रतिनिधी : विनायक गुरसाळी
चिचोंडी पाटील : २६ / नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे श्रीदत्त सामाजिक प्रतिष्ठान,इंजि.प्रविणदादा कोकाटे मित्र मंडळ व आनंदऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये वयोवृद्ध नागरिक त्याचप्रमाणे अनेक गरजू रुग्णांनी सहभाग नोंदविला व संबंधित आजाराचे निदान करून घेतले.
अहमदनगर येथील नामांकित हॉस्पिटलचे डॉक्टर व स्टाफ यांनी चिचोंडी पाटील मध्ये येऊन रुग्ण तपासणी केली व आजारांचे निदान केले,यामुळे वेळ व पैसा दोन्हींची बचत झाल्याचे मनोगत अनेक रुग्णांनी व्यक्त केले.
यावेळी मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे, शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे,मा.उपसरपंच शरदभाऊ पवार,मा.सरपंच मच्छिंद्र खडके,शंकरराव पवार,डॉ.मारूती ससे,महादेव खडके,दिलीप पवार, मुख्याध्यापक प्रकाश ठोंबरे,अंबादास फिसके, काशिनाथ वाडेकर,पंडित कोकाटे,ज्ञानेश्वर ठोंबरे, भाऊसाहेब वाडेकर,रामभाऊ काळे,शैलेश देवकर,काशिनाथ बेल्हेकर,बबन कोकाटे,संदीप कोकाटे,अर्जुन वाडेकर,विठ्ठल कोकाटे,बाबासाहेब परकाळे, प्रकाश कांबळे,दत्तात्रय कोकाटे,रमेश कुलथे,जयसिंग दळवी,ज्येष्ठ नागरिक संघाचे धर्मा हजारे गुरुजी,बाबासाहेब पवार सर,दिनकर भोस गुरुजी,संजय पवार,राजेंद्र पवार,अमोल काकडे,राजू तनपुरे,राम पवार, अंबादास मांढरे,महादेव तनपुरे, आनंदऋषीजी हॉस्पिटलचे डॉ.रवींद्र येळीकर,प्रतिक कांबळे,सिस्टर सुनिता गायकवाड,सुरेखा कोळगे आदींसह ग्रामस्थ व तपासणीसाठी आलेले रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

