shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

‘हेल्मेट’च्या जनजागृतीसाठी पाेलिसांची गांधीगिरी..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. रविवार दिनांक १२ जून २०२२

‘हेल्मेट’च्या जनजागृतीसाठी पाेलिसांची गांधीगिरी..!!

अहमदनगर : हेल्मेट वापरा, अपघात टाळा हा संदेश देण्यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे आज डीएसपी चाैकात जनजागृती करून चांगलीच गांधीगिरी करण्यात आली. हेल्मेट वापरणाऱ्या नागरिकांना चक्क गुलाबाचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तर हेल्मेट न वापरणाऱ्या बेशिस्त, नाठाळ वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी तब्बल ५०० रुपयांचा दंडही ठाेठावण्यात येत आहे.
 नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगर शहर वाहतूक शाखेचे पाेलिस चांगलेच सरसारवले आहे. हेल्मेटच्या जनजागृतीसाठी शहरातील भिस्तबाग, आयुर्वेद, सावेडी नाका, दिल्लीगेट आदी विविध चाैकात माेहीम राबविली जात आहे. दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी नागरिकांनी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. नाहीतर नाहक अपघाताला आमंत्रण दिले जाते. आज दिवसभरात ५०० रुपये दंडाप्रमाणे २० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. याच माेहिमेचे जिल्ह्यातील पाेलिसांनीही अनुकरण करणे गरजेचे आहे. पाेलिस निरीक्षक राजेंद्र भाेसले, सहायक निरीक्षक राजेंद्र पाटाेळे, जालिंदर शिंदे, सजंय गवळी, संजू शिंदे, विकास दळवी, युवराज गव्हाणे, राजाराम माेरे, भाऊसाहेब वाघ, अमाेल खुटे आदी उपस्थित हाेते.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close