shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकऱ्यांना फसवणारी टोळी नगर तालुक्यात सक्रिय..!!



नगर पोलीस कारवाई करणार का..?

नगर प्रतिनिधी:नगर तालुका हा आधिच दुष्काळग्रस्त तालुका आहे. या दुष्काळाग्रत भागात पाणी हि समस्या शेतकरी आणि प्रशासनास हि चांगल्याप्रकारे परिचयत आहे. पिण्याचे पाणी टंचाई असो शेती पाणी टंचाई याला उपाय शोधण्यासाठी या तालुक्यातील शेतकरी नागरीक बोरवेल,अथवा विहिरी खोदकाम करण्यास प्राधान्य देतात हिच बाब काही ठंगानी ओळखून नगर तालुक्यातील काही भागात ती अंमलात आणण्यास सुरुवात केली. 



शेतकऱ्यांना एका विशेष पध्दतीने गंडा घालण्याचे काम काही इसम करत असल्याची विशेष माहिती हाती आली आहे. हि टोळी आधी मालक गावातील प्रतिष्ठित व्यक्तीचा विश्वास संपादन करते तर काहीना खास विशिष्ट मेजवानी दिली जाते. मग ईथुन या फसवणुकीचा फारसं सुरू होतो. 

नगर तालुक्यातील अकोळनेर येथील दत्तात्रय रोहकले यांना यांचा प्रत्यय आला त्यांनी अकोळनेर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती समक्ष सात परस विहीर खोदकामाचा व्यवहार ठरवला आणि रक्कम देऊन कामा प्रत्यक्षात सुरुवात झाली काम चार परस पुर्ण झाले. मग या टोळीची खास पध्दतीने गावाला  जवळचे नातेवाईक आजारी पडले भेटायला जावं लागेल असे विविध कारणांनी त्या ठिकाणी घरी जाऊन येतो म्हणून जायचं नंतर संध्याकाळी सर्व खोदकामाचे सर्व मशिन साहित्य घेऊन पोबारा करायचा तसं रोहकले यांना यांचा  पध्दतीने या टोळीने फसवले दत्तात्रय रोहकले यांनी या व्यक्तींशी अनेक वेळा संपर्क साधला असता ते उडवा उडवीचे उत्तर देण्यास सुरुवात केली.नंतर धमक्या देणे सुरू केले काम करुन देणारा नाही काय करायचं ते करा आमचं... करत नाही.
 
मग रोहकले यांनी या विषयी नगर तालुका पोलिस स्टेशन तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांना लेखी तक्रार दिली आहे.

हि बाब पत्रकारांना समजली असता  या विषयी अधिक माहिती घेतली असता यात अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले. अकोळनेर येथील धोडीभाऊ कोळगे, भाऊसाहेब रोहकले, दत्तात्रय रोहकले, चास येथील पांडुरंग गायकवाड,  अशा चार शेतकऱ्यांना अडीच लाख रुपयेना ग़ंडा घातल्याचे समोर आले. या विषयी जिल्हा पोलिस अधीक्षक यां विषय लक्ष योग्य ती कारवाई आदेश देण गरजेचं आहे. तालुका पोलिस या ठंगाना वठणीवर आणुन या शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाली या प्रकरणी न्याय मिळवून देणार का हे पाहणं औचित्याच ठरणार आहे.



मी माझ्या शेतात सात परस विहीर खोदकाम करण्यास ठेकेदारास दिले होते. सदर काम  सात परस काम न करताच अर्धवट काम सोडून पुळुन गेले. माझी ७० हजार रुपयांची फसवणूक केली आहे.मी जिल्हा पोलिस अधीक्षक व नगर तालुका पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. अद्याप मला न्याय मिळाला नाही.

(दत्तात्रय रोहकले शेतकरी 
अकोळनेर)
close