नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :
नगर तालुक्यातील वडगाव येथे (दि.८) जुनं च्या संध्याकाळी ८. वाजण्याच्या दरम्यान वादळीवाऱ्यासह पाऊसास सुरवात झाली होती.यांच वादळीवाऱ्यासह दरम्यान गणेश सुभाष रणसिंग यांची गौरी नावांची म्हैस अंगणात बांधलेली होती.त्या पावसा दरम्यान गौरी नावाच्या म्हशीच्या अंगावर विज कोसळुन म्हैस जागीच दगावली. या घटनेची खबर महसुली विभागास दिल्यानंतर महसुल विभागाचे तलाठी श्रीनिवास गौडा यांनी घटनास्थळी येऊन सदर घटनेचा पंचनामा करून तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याला आहे. सुभाष रणसिंग यांची अंदाजे ९० हजार रुपये किंमतीची म्हैस दगावल्याची प्राथमिक माहिती आहे.
या नैसर्गिक आपत्ती मुळे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांत रणसिंग कुंटुबाची परिस्थिती हालाखीची आहे.त्या मुळे या नैसर्गिक आपत्तीतुन सावरण्यासाठी आथिर्क नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी रणसिंग कुटुंबाने केली आहे.
या वेळी वडगावचे सरपंच अनिल ठोंबरे, तलाठी श्रीनिवास गौडा, चेअरमन रावसाहेब रणसिंग, शहाजी रणसिंग, दत्तात्रय रणसिंग या वेळी उपस्थित होते.


.jpeg)

