शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक २४ जून २०२२
श्री शिवाजी विद्यानिकेतन मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आमरण उपोषणाला प्रहारचा पाठिंबा..!!
राहुरी फॅक्टरी : राहुरी फॅक्टरी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिवाजी विद्यानिकेतन मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिक्षकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे, त्यास आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला व शाळा प्रशासनाने या आंदोलनकर्त्यांच्या मागणीवर तोडगा काढून त्यांना उपोषणापासून परावृत्त करावे अशी मागणी केली आहे.
प्रसंगी प्रहारचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष विजय कुमावत, राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष शरद वाळुंज, उपाध्यक्ष एकनाथ वाणी, गणेश भालके, संघटक प्रभाकर कांबळे, प्रशांत कराळे आदी उपस्थित होते.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

