shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बावडा येथील संग्रामसिंह पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती.

बावडा येथील संग्रामसिंह पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती.

इंदापूर प्रतिनिधी: बावडा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस तसेच इंदापूर तालुका युवक काँग्रेस प्रभारी
या पदावर ज्यांनी काम केले असे संग्रामसिंह प्रशांतराव पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी  दि ३१ मे २०२२ रोजी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे गृह मंत्री ना. दिलीप वळसे पाटील , युवक प्रदेश अध्यक्ष  मेहबूब शेख, राष्ट्रवादी पुणे जिल्हा अध्यक्ष  प्रदीप  गारटकर यांच्या उपस्थितीत  नियुक्ती  करून तसे पत्र देण्यात आले.


राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभे कराल अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या सहीचे पत्र संग्रामसिंह पाटील यांना देण्यात आले.

संग्रामसिंह पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस पदी निवड झाल्याने इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

यावेळी संग्रामसिंह पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार,प्रदेशअध्यक्ष जयंतराव पाटील,उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रियाताई सुळे,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, युवकप्रदेशअध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबुतीसाठी प्रयत्न करणार आहे.
close