shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज पालखीचे स्वागत.

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज पालखीचे स्वागत.
इंदापूर प्रतिनिधी:पाऊले चालती पंढरीची वाट दि.२९ जून रोजी जगतगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर तालुक्यात सायंकाळी ५ वाजता आगमन भवानिनगर येथे झाले. अतिशय भक्तिमय वातावरणात ज्ञानोबा तुकोबाच्या  गजरामध्ये लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये इतर  पदाधिकाऱ्यांच्या बरोबरीने इंदापूर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनेही 
 इंदापूर तालुक्याचे आमदार राज्याची राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच ग्रामस्थ यांच्यासह  पालखीचे स्वागत करण्यात आले.

 यावेळी प्रताप  पाटील, हनुमंत  कोकाटे, सचिन सपकळ, नवनाथ  रूपनवर, शिवाजी तरंगे  ,महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर, शोभा मोहिते ,सुनिता भोसले, उज्वला परदेशी, सर्व पदाधिकारी व प्रशासन यांनी पालखीचे स्वागत केले. इंदापूर तालुक्यातील पोलिस, आरोग्य विभाग, विविध विभागाच्या वतीने आवश्यक सेवा सुविधा  उपलब्ध केली करण्यात आल्या.   यामध्ये महिलांना सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, जेणेकरुन सर्व वारकरी संप्रदाय मंडळी सुखरूप पंढरपूर येथे पोहचतील यासाठी इंदापूर तालुक्यातील मान्यवरांनी याची दखल घेतली आहे .
close