भविष्यात तालुक्यातील बेरोजगारी कशी कमी करता येईल त्याबाबत सर्वतोपरी या ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करीत राहू - भरत शहा.
इंदापूर प्रतिनिधी:भविष्यात या तालुक्यातील युवक-युवतींची बेरोजगारी कशी कमी करता येईल त्याबाबत सर्वतोपरी नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करीत राहू असे कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ चे सचिव मुकुंद शहा यांच्या वाढदिवसानिमित्त नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर यांच्या माध्यमातून युवक-युवतींसाठी नोकरी महोत्सवाचे आयोजन दिनांक १८ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते यावेळी समारोप कार्यक्रमाप्रसंगी दिवसभर या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करताना प्रतिपादन केले.
आज दिवसभर सर्वांनी नोकरी महोत्सवाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य केले त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी काही स्वरूपात गैरसोय झाली असेल त्याबद्दल आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. भविष्यकाळात अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्यास आपण सहकार्य करावे असे आवाहन बोलताना भरत शहा यांनी केले.
ते पुढे म्हणाले की,भविष्यामध्ये इथून पुढे आपण सहा महिने पुढे सेंटर चालवणार आहोत. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना आपण सहकार्य करावे असे आवाहन करतो. आज या नोकरी महोत्सवात १२५० च्या आसपास युवक-युवतींनी नोंदणी केली. त्यामध्ये ७५० जणांना निवड पत्र दिले. या सर्वांना शुभेच्छा देतो. जे काही जणांची निवड झाली नाही. टेक्निकल बाबी मुळे त्यांची निवड झाली नसेल. त्यांच्यासाठी सर्व बाबींची पूर्तता करून त्यांची या नोकरीसाठी कशी निवड होईल यासाठी निश्चितच प्रयत्न केला जाणार आहे . भविष्यात या तालुक्यातील युवकांचे युवक-युवतींची बेरोजगारी कशी कमी करता येईल त्याबाबत सर्वतोपरी या ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करीत राहू असे मत भरत शहा यांनी व्यक्त करून उपस्थित व या कार्यक्रमास सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
यावेळी मुकुंद शहा, रघुराम गायकवाड,अंगद शहा, जावेद शेख, हमीद आतार, प्रमोद राऊत, अशोक चव्हाण, पोपट पवार, हर्षद सय्यद, सुनील तळेकर, दत्तू पांढरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
युवक-युवतींना नोकरी महोत्सव मध्ये योग्य ते मार्गदर्शन व्हावे तसेच उपस्थित झालेल्या कंपन्यांना सुविधा चांगल्या पद्धतीने कसे मिळतील यासाठी शहा परिवारातील मुकुंद शहा, भरत शहा, अंकिताताई शहा, वैशालीताई शहा, अंगद शहा, ऋचिता शहा हे दिवसभर या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मार्गदर्शन करीत होते.
तसेच शहा परिवाराचा मित्र परिवार ही या ठिकाणी आपापल्या परीने सहकार्य करीत असताना दिसत होता.
शहा ब्रदर्स अँड कंपनी चे सर्व स्टाफ हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तत्परतेने कार्यभार सांभाळत असताना दिसत होता.
नोकरी महोत्सवाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी रामराजे कापरे, ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष नंदकुमार गुजर, रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय शहा, मुकुंद शहा, भरत शहा व अंकिताताई शहा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी
विद्या महाजन माजी नगराध्यक्षा,सायरा आत्तार पतंजली योग समिती इंदापूर महिला अध्यक्षा, गणेश महाजन यांनी उपस्थिती दर्शवली.
मुकुंद शहा यांच्या वाढदिवसानिमित्त युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहा बंधूंच्या वतीने व ट्रस्टच्यावतीने हा उपक्रम राबवून खरोखरच नव्या पिढीला एक नावीन्यपूर्ण दिशा देण्याचा प्रयत्न झाल्याने शहा बंधूंचे विशेष कौतुक मित्र परिवाराच्या वतीने हमीद आतार यांनी केले.

