शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक १३ जून २०२२
साहित्यिक समाजाला दिशा देण्याचे काम करतात : आ. संग्राम जगताप | शब्दगंध साहित्य पुरस्कार वितरण समारंभ संपन्न..!!
अहमदनगर : साहित्यिक हे आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम करतात, शब्दगंधने साहित्यिकांच्या लिहित्या हातांचे कौतुक करुन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकल्याने लिहिणाऱ्याना निश्चितच बळ मिळते असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्यावतीने राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदेव पांडुळे होते. तर उपजिल्हाधिकारी गणेश मरकड, कवी चंद्रकांत पालवे,भाऊसाहेब सावंत, प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. संग्राम जगताप म्हणाले की, ग्रामीण भागातील नव लेखकांना शब्दगंधच्या माध्यमातून चांगली दिशा मिळत असून उद्याचे मोठे लेखक त्यातून तयार होतील. या प्रकारच्या राज्यस्तरावर स्पर्धा आयोजित केल्यामुळे लेखकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळत आहे. ही चांगली संकल्पना शब्दगंध राबवीत आहे.
यावेळी गणेश मरकड म्हणाले की, राज्यांमध्ये साहित्यिक क्षेत्रात ज्या नामवंत संस्था आहेत त्यामधे अलिकडील काळात शब्दगंधचाही आवर्जून उल्लेख होत असून लेखकांना पाठबळ देण्याचे काम शब्दगंध सातत्याने करत आहे.
यावेळी डॉ. संजय कळमकर आपल्या मुख्य भाषणात म्हणाले की, ग्रामीण भागात कसदार साहित्य निर्माण होत असून आपल्या मायबोलीतून समाजाचे प्रश्न, अडीअडचणी, सुख दुःख नवीन लेखक मांडत आहेत, त्यामुळे नव्या लेखकांना अशा प्रकारचे पाठबळ मिळणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने शब्दगंध आपली चोख भूमिका बजावत आहे,
यावेळी भाऊसाहेब सावंत, प्राचार्य जी.पी.ढाकणे, लेविन भोसले,चंद्रकांत पालवे यांनीही मनोगते व्यक्त केली.
धुळे येथील अभिनव खानदेशचे संपादक प्रभाकर सूर्यवंशी, हरिभाऊ नजन, प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे, मधुसूदन मुळे, डॉ.शंकर चव्हाण, रामप्रसाद देशमुख या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
दशरथ चौरे,मांगीलाल राठोड, बबन धुमाळ,दौंड, डॉ.अशोक ढगे,नेवासा, भानुदासआहेर,प्रा.डॉ.राजेंद्र थोरात,पुणे, उमेश घेवरीकर,शेवगांव, कु.श्रुती गालफाडे,लातूर, कु.अस्मिता मराठे, ज्ञानेश्वर जाधवर, बार्शी, सौ.माधुरी मरकड,पोपट वाबळे, बारामती, डॉ.शिवाजी काळे,श्रीरामपूर, प्रा.शशिकांत शिंदे,कोल्हार, डॉ.राजेश गायकवाड,सुनीता सावरकर, औरंगाबाद, डॉ.शुभांगी गादेगावकर,ठाणे,रघुराज मेटकरी,विटा यांना स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र,शाल व पुस्तकं देउन सन्मानित करण्यात आले.
यावेळी भगवान राऊत यांनी "बाईमाणूस" या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म ची संकल्पना विशद केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.अशोक कानडे, स्वाती ठुबे, सुनीलकुमार धस, बबनराव गिरी,ऋषिकेश राऊत,राजेंद्र पवार,शहाराम आगळे, आर.आर.माने, राजेंद्र फंड,प्रमोद येवले,किशोर डोंगरे, प्रशांत वाघ, शर्मिला रणधीर, राजेंद्र उदारे, दिशा गोसावी, निखिल गिरी, भाग्यश्री राऊत, जयश्री झरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील गोसावी यांनी, सूत्रसंचालन शर्मिला गोसावी यांनी तर आभार सुभाष सोनवणे यांनी मानले.
या कार्यक्रमास अनेक साहित्यिक व साहित्य रसिक उपस्थित होतें.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

