शिर्डी (अहमदनगर) :- अखिल वडार बोली साहित्य मंडळ, पुणे आयोजित अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन - 2022 पूर्वतयारी प्राथमिक बैठक रविवार दिनांक 3 जुलै 2022 रोजी सकाळी 11.00 वा. शासकीय विश्रामगृह, शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर येथे मा. श्री. टी. एस. चव्हाण, संस्थापक अध्यक्ष - अखिल वडार बोली साहित्य मंडळ, पुणे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सदर बैठकीचे उद्घाटन मा. श्री. कृष्णा शिंदे, उद्योजक - श्रीरामपूर यांच्या शुभहस्ते श्री साईबाबा यांचे प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले.प्रास्ताविक मा. श्री. अशोक पवार, पुणे जनरल सेक्रेटरी - अखिल वडार पोलीस साहित्य मंडळ पुणे यांनी केले.
या बैठकीत (१) अखिल वडार बोली साहित्य मंडळ, पुणे या संस्थेचे मार्फत अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन - 2022 पुणे हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने यावर्षी दिवाळीची सुट्टीत घेण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
(२) आगामी साहित्य संमेलन - 2022 करिता लागणारे खर्चाचे अंदाज पत्रकास विचारविनिमय करून सर्वांनुमते मंजुरी देण्यात आली.
(३) आगामी साहित्य संमेलन - 2022 यशस्वी होण्याकरिता आवश्यक आर्थिक निधी उभा करण्यासाठी " वैभवशाली वडार समाज गौरव अंक - 2022 " प्रकाशित करणे त्यामध्ये समाजपयोगी विविध संकलित माहिती प्रकाशित करणे, त्यासाठी आवश्यक जाहिराती / देणगी, वर्गणी सभासद फी मार्फत जमा करणेस सर्वांनुमते मंजुरी देण्यात आली.
(४) आगामी साहित्य संमेलन -22 यशस्वी करण्यासाठी मागील अनुभव, सुचना लक्षात घेवून एक मुख्य संयोजन समिती सर्वांनुमते गठित करण्यात आली आहे. ती पुढील प्रमाणे -
अध्यक्ष - मनोहर मुधोळकर, सोलापूर,उपाध्यक्ष - प्रा. रामचंद्र मिरेकर, सांगली,प्रोफेसर महादेव देशमुख सोलापूर,लक्ष्मण पवार, पुणे,अनिल विटकर, पुणे
जनरल सेक्रेटरी - कृष्णा शिंदे, श्रीरामपूर
सह सेक्रेटरी - शामराव विटकर, पुणे
कार्याध्यक्ष - सुरेश विटकर, पुणे
सह कार्याध्यक्ष - मच्छिंद्र धनवटे, औरंगाबाद
संघटक - डाॅ. प्रा. अशोक बंडगर, औरंगाबाद,
रामचंद्र मंजुळे, अहमदनगर
वसंतराव शिंदे, मुंबई; कार्यक्रम सदस्य - कृष्णा शिंदे, श्रीरामपूर,शंकर कुर्हाडे, शिर्डी,मुरलीधर शेलार, अ.नगर, समन्वयक - हरिष बंडीवडार, पुणे, हरिभाऊ कुसाळकर, पुणे; उलगा गुंजाळ, पुणे.
प्रसिद्ध प्रमुख - सचिन चव्हाण, औरंगाबाद,लखन पाटकर, पुणे वरील नावांचा समावेश असून पुढील बैठकीत संयोजन समितीत आणखी नवीन नावे वाढ तसेच महिला पदाधिकारी यांचा समावेश करण्याबाबत निर्णय घेण्याचे ठरले आहे.
(५) आगामी अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन - 2022 हे यावर्षी दिवाळीचे सुट्टीत घेण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
सदर बैठकीस मनोहर मुधोळकर, सिद्राम चौगुले सोलापूर, प्रा. रामचंद्र मिरेकर, सांगली, शंकर कुर्हाडे, रामचंद्र मंजुळे, रमेश जेठे, मुरलीधर शेलार ,अहमदनगर; अशोक पवार, हरिभाऊ कुसाळकर, उलगा गुंजाळ, लखन पाटकर, शामराव विटकर, पुणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पावसामुळे व रस्त्यात दिंडीचे वातावरण असल्याने वाहने गर्दीत अडकले. त्यामुळे अनेक जण या बैठकीस पोहचू शकले नाही. या बैठकीचे आभार प्रदर्शन व समारोप शांताराम मनवरे खजिनदार - अखिल वडार बोली साहित्य मंडळ, पुणे यांनी केले
या बैठकीचे उत्कृष्ट नियोजन पत्रकार रमेश जेठे(सर); रामचंद्र मंजुळे,कृष्णा शिंदे, शंकर कुराडे
मुरलीधर शेलार यांनी केले होते.

