shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अपंग निराधार जेष्ठ नागरिक योजनेचे 3 महिन्यापासून थकित अनुदान त्वरित देणेबाबद जिल्हाधिकारी यांना निवेदन...!

अहमदनगर प्रतिनिधी रमेश जेठे (सर):-
शिवसेना अपंग सहाय्य सेना राहुरी तालुका व अहमदनगर जिल्हा यांच्या वतीने अपंग निराधार जेष्ठ नागरिक योजनेचे 3 महिन्यापासून थकित अनुदान त्वरित देणेबाबद जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.             
        
       शिवसेना अपंग सहाय्य सेना राहुरी तालुका प्रमुख श्री. संजय शामराव पा. झांबरे  व महिला आघाडी तालुका प्रमुख सौ. सुनिता संजय पा. झांबरे व जिल्हा प्रमुख जालिंदरजी लहामगे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा यांच्या वतीने दि. 15 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

      निवेदनात नमुद केले आहे की,अहमदनगर जिल्ह्यातील मागील 3 महिन्यापासून  संजय गांधी निराधार योजना, विधवा, श्रावण बाळ, जेष्ठ नागरिक, अंध - अपंग यांचे अनुदान ( डोल ) मिळालेले नाही, त्यामुळे राहुरी तालुका व सर्व अहमदनगर जिल्हातील लाभार्थी हे सरासरी शासनाच्या अनुदानावर, दैनंदिन खर्च औषधोपचार व  उदरनिर्वाह करीत असतात. 

    तरी तात्काळ सर्व तहसीलदार व कार्यालयांना उपाय योजना करुन, मागील 3 ते 4 महिन्यापासूनचे थकित अनुदान 15 दिवसाच्या आत त्वरित देणेबाबद आदेश व सुचना  कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे व अंदोलना दरम्यान काही अनुचित घटना घडल्यास त्यांची सर्व जबाबदारी शासनाची असेल असे निवेदनात म्हटले आहे.
close