shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज येथील बाबुरावजी आडसकर महाविद्यालयास राष्ट्रीय मुल्यांकन परिषदेकडुन B++ मानांकन!!

रमेशराव आडसकर यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचे केले कौतुक!!


प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-

केज येथील छञपती शिवाजी शिक्षण संस्था आडस संचलित बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाचे दि.13 व 14 जुलै रोजी केंद्रीय पातळीवरील नॕक चे मुल्यांकन झाले होते.  चेअरमन म्हणुन आसाम विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरु देबाशिष भट्टाचार्यजी व समन्वयक सदस्य तेलंगना येथील प्रोफेसर डॉ.नागज्योती कोरीपेल्ला,व सदस्य म्हणुन वारानसी येथील आर्य महिला कॉलेजच्या प्राचार्य डॉ.रचना दुबे हे भेट देवुन गेले होते.

       



या राष्ट्रीय समितीने महाविद्यालयातील शैक्षणिक ,भौतिक सुविधा ,ग्रंथालय,सर्व कला ,वाणिज्य व विज्ञान शाखे अंतर्गत येणाऱ्या  विभागांची व प्रशासकीय विभागाची तपासणी केली होती.

       

नुकताच महाविद्यालयास या परिषदेकडून B++ मानांकन असल्याचा इमेल प्राप्त झाला आहे अशी माहिती बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.जी..फावडे यांनी दिली.

महाविद्यालयाच्या या यशा बद्धल  श्री.छञपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव रमेशराव आडसकर साहेब   व सौ.अर्चनाताई आडसकर यांनी  प्राचार्य डॉ.फावडे ,कार्यालयीन  पी.एस.भोसले,समन्वयक डॉ.संभाजी भंडे,डॉ.नवनाथ काशिद व सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

close