◼️तात्काळ नुकसानीचा अहवाल सादर करण्याच्या तलाठ्यांना दिल्या सुचना !
वरोरा (चंद्रपूर )
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू असुन या पावसामुळे अनेक घरांचे अशंता व पूर्णता नुकसान झाल्याचे वृत्त आहे.तसेच नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक पुल पाण्याखाली गेल्याच्या व घरात पाणी शिरल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.तसेच अनेक गावांमधील शेत पिके पाण्याखाली गेली आहेत.त्या पार्श्वभूमीवर वरोरा येथील तहसीलदार रोशन मकवाने व तालुका कृषी अधिकारी भोयर यांनी तालुक्यातील कोटबाळा , भटाळा , पोहा , खेमजई , चारगांव तदवतचं महसुल मंडळातील काही गावांना प्रत्यक्ष भेटी देवून पाहणी केली व नुकसानीचा आढावा घेतला .या दौ-याच्या वेळी त्यांचे सोबत नायब तहसीलदार एम. एम. काळे, खांबाडा मंडळ अधिकारी महादेव कन्नाके, तलाठी कु. यामिनी रामटेके, मंडळ कृषी अधिकारी काळे ,पोहा सरपंच श्रीमती झाडे व अन्य कृषी सहायक उपस्थित होते.प्रसंगी शेती व घरांचे नुकसानीचे अहवाल संबंधित तलाठ्यांनी मौक्का चौकशी करुन तात्काळ सादर करण्याच्या सुचना केल्या आहे.





