shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजप युवा मोर्चा इंदापूर तालुका आढावा बैठक राजवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.*

*भाजप युवा मोर्चा इंदापूर तालुका आढावा बैठक राजवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.*
   इंदापूर प्रतिनिधी:राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१६ जुर्ले रोजी इंदापूर येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी युवकांशी संवाद साधला.
     भारतीय जनता पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी यावेळी राजवर्धन पाटील यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य युवकापर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे मत व्यक्त केले.
    हे सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याने नागरिकांच्या कल्याणाच्या  योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी राजवर्धन पाटील यांनी केले केले.
close