भाजपा ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्यावतीने श्री संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम ना.रा. हायस्कूल येथे ठेवल्याबद्दल देहु संस्थांचा सन्मान.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूरकरांच्या विनंतीस मान देऊन पालखी मुक्काम नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये ठेवल्याबद्दल भारतीय जनता ओबीसी तालुकाध्यक्ष श्री.पांडुरंग (तात्या) शिंदे मित्र परिवाराच्यावतीने देहू संस्थेचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, माणिक मोरे, भानुदास मोरे,अजित मोरे, सोनदेव मोरे, विशाल मोरे, मधुकर मोरे, सुनील मोरे,रामदास मोरे,रोहन मोरे, विठ्ठल मोरे, रामेश्वर महाराज (धुळे) यांचा हार,नारळ व शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी पांडुरंग (तात्या) शिंदे,राजाभाऊ गार्डे, प्रकाश पवार,विशाल फोंडे,आदित्य बोराटे,तेजस शिंदे,ओंकार हिंगमिरे,शुभम चव्हाण,सूरज महामुनी,हनीफ बेपारी,आदी उपस्थित होते.

