2020 मध्ये राक्षसी कोरोना च्या आगमनामुळे जवळपास सगळ्या च क्षेत्राच्या अर्थचक्राला ब्रेक लागला होता.सगळ्याच क्षेत्रातील व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले. पण सर्वात जास्त कुठल्या क्षेत्राला याचा अधिक फटका बसला असेल तर तो म्हणजे मनोरंजन क्षेत्र.आणि यात सुद्धा मराठी सिने सृष्टीला त्याचा अधिक फटका बसला, त्यातूनच सावरून आत्ता कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्यापासून परत मराठी सिने सृष्टी ला बहर येताना दिसत आहे.
हळूहळू सर्व पूर्व पदावर येत आहे, रमेश पवार लिखित दिग्दर्शित मराठी चित्रपट बात्तकु एक वास्तविकता ह्या चित्रपटाची सुरवात सुद्धा 2020 च्या फेब्रुवारी मध्ये करण्यात आली होती मात्र दुर्दैवाने कोरोनाचं आगमन झालं आणि नंतर कोरोना-लॉकडाऊन-नियमावली अशा अनेक अडचणी मुळे त्याला त्यावेळी तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घ्यावा लागला होता.पण चित्रपटाचे तरुण दिग्दर्शक रमेश पवार आणि त्यांच्या टीमने सातत्याने त्यावर काम सुरू ठेवले.
कोरोना मुळे असंख्य अडचणी जरी आल्या तरी त्या काळात खचून न जाता सिनेमाच्या प्रत्येक बाबी वर अजून सखोलपणे अभ्यास करण्यावर त्यांनी भर दिला,
बात्तकु एक वास्तविकता हा एक कौटुंबिक चित्रपट असून खास करून तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल असं मत चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश पवार यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केलं.
रमेश पवार हे कला-समृद्धी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष असून 2019 मध्ये या महोत्सवात तब्बल 72 देशाच्या चित्रपटाचा समावेश हा विक्रम त्यांनी नोंदविला.त्यामुळेच बात्तकु ची तांत्रिक बाजू अत्यंत भक्कम होणार असून ती संभाळण्यासाठी देश विदेशातील तज्ञ कलाकारांची निवड करण्यात आली आहे.त्या मध्ये मराठी चित्रपट सृष्टी सह देश विदेशातील अनेक लोकांचा समावेश असल्याचं टीम ने सांगितलं.
ह्या मध्ये काही नवीन कलाकारांच्या पदार्पणासह
चित्रपटात काम करणाऱ्या दिगग्ज कलाकारांची, निर्मात्यांची नावं सध्या गुलदस्त्यात असून बॉलिवूड च्या काही कलाकारांचा या मध्ये समावेश असणार आहे.
सिनेमाच्या चित्रीकरण मुहूर्ताच्या वेळी निर्माते,कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींचे नाव जाहीर करण्यात येतील असं या वेळी सांगण्यात आलं.
सिनेमाच्या प्रत्येक बाबीवर बारकाईने अभ्यास झाला असून अहमदनगर, औरंगाबाद, यवतमाळ, जिल्ह्यातील काही ठिकानासह मुंबई ची चित्रीकरणासाठी निवड करण्यात आली आहे.ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याचे सुपुत्र रमेश पवार हे करणार आहेत तर सहायक दिग्दर्शक म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील प्रकाश दळवी हे काम पाहणार आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कलाकार असणारा बहुतेक हा एकमेव चित्रपट ठरू शकेल.
हा चित्रपट 2023 च्या मार्च पर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती रमेश पवार यांनी दिली ...

