shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वक्तृत्वशैलीने जिंकले श्रोत्यांचे मन विद्या प्रतिष्ठान,भिगवणमधील विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश...

वक्तृत्वशैलीने जिंकले श्रोत्यांचे मन 
विद्या प्रतिष्ठान,भिगवणमधील विद्यार्थ्यांचे  दैदिप्यमान यश...
इंदापूर -भिगवण दि १६.
विद्यार्थ्यांमधील  सभाधीटपणा  वाढावा व सुप्त गुणांचा विकास व्हावा यासाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे यांच्यातर्फे  भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेमध्ये मराठी, हिंदी, संस्कृत  आणि  इंग्रजी अशा विविध भाषांमधून विद्यार्थ्यांनी आपले मतप्रदर्शन व विचार मांडले.  या स्पर्धेत विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडियम स्कूलच्या  विद्यार्थी व शिक्षकांनी भरघोस यश संपादन केले.टिळकांचे व्यक्तिमत्व, आधुनिक विचारसरणी याविषयी हिंदी भाषेमध्ये विचार मांडून शाळेतील शिक्षिका सौ. मनिषा मोरे यांनी  या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. या गटनिहाय स्पर्धेमध्ये गट क्र.-२  हिंदी भाषेमध्ये  कु. संस्कार भोसले याने प्रथम क्रमांक पटकावला.  कु.अनुष्का सोलनकर  या विद्यार्थिनीने  इंग्रजी भाषेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला तसेच कु. पूर्वा कोठारी हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. हिंदी भाषेमध्ये  गट क्र.- १ कु.आर्या सिंग हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन यशस्वी होण्यासाठी शाळेच्या प्राचार्या सरिता शिंदे व इतर भाषा शिक्षकांनी  मोलाचे मार्गदर्शन केले.
close