shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने पतंजली योग समिती युवा भारत इंदापूर यांच्या वतीने वीर जवानांना अभिवादन.

कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने पतंजली योग समिती युवा भारत इंदापूर यांच्या वतीने वीर जवानांना अभिवादन. 
  इंदापूर प्रतिनिधी:  पतंजली योग समिती व युवा भारत यांच्यावतीने इंदापूर नगरपालिके शेजारील जि. प. शाळा एक व दोन येथे सुरू असलेल्या स्थायी योग वर्गामध्ये सर्वसाधारकांच्या वतीने कारगिल विजय दिन कारगिल दिनाचा विजय असोचा जय घोषात  साजरा करण्यात आला.     

पहाटेच्या शुभसमयी देशभक्तीपर गीतांवरती योगसाधना करण्यात आली. यावेळी  इंदापूर नगरपालिकेसमोरील अमर ज्योती स्मारकाला पुष्पहार अर्पण करूनशहीद जवानांनाना अभिवादन करण्यात आले.

     कारगिल युद्धामध्ये सहभाग घेतलेले  देशसेवेतुन सेवानिवृत्त झालेले योग समितीचे योगसाधक श्री बाजीराव शिंदे (मेजर )यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
close