shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संत सावता महाराज यांचे पुण्यतिथी निमित्त निमगाव केतकी येथे अखंड हरिनाम सप्ताहास सुरूवात.

संत सावता महाराज यांचे पुण्यतिथी निमित्त निमगाव केतकी येथे अखंड हरिनाम सप्ताहास सुरूवात.
इंदापूर प्रतिनिधी:निमगाव केतकी दि २१ निमगाव केतकी येथील संत सावतामाळी ट्रस्ट व समाज बांधव सालाबादप्रमाणे संत सावता महाराज यांचे पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह , ज्ञानेश्वरी पारायण , सुश्राव्य कीर्तन , प्रवचन , भजन असे विविध कार्यक्रम सुरूवात आज पासून संत सावतामाळी मंदिरात करण्यात आली.
        
         यावेळी उपस्थित मान्यवर , कीर्तनकार , भजनी मंडळ व ग्रामस्थ यांचे हस्ते विधीवत ध्वज उभारणी करण्यात आली. त्याचप्रमाणे वीणा , पखवाज , टाळ पुजन करण्यात आले. सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार हभप सागर महाराज बोराटे यांचे कीर्तन होणार असून.मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होतात. सर्वासाठी भोजन सोय करण्यात आली आहे.
    यावेळी माजी उपसभापती तथा सदस्य देवराज जाधव , माजी सभापती दत्तात्रय शेंडे , पांडुरंग हेगडे , रतन हेगडे , गोरख आदलिंग , माणिक भोंग , हभप चैतन्य महाराज बारवकर , बबन खराडे , प्रताप हेगडे , राजकूमार राऊत , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close