लाखेवाडी युवाशक्ती ग्रुपने वारकऱ्यांचे चहा व अल्पोपहार देऊन केले स्वागत.
इंदापूर प्रतिनिधी: लाखेवाडी येथे लाखेवाडी युवाशक्ती ग्रुप च्या वतीने पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचे चहा व अल्पोपहार देऊन स्वागत करण्यात आले.
श्री संत सोपान काका महाराज व श्री संत संतराज महाराज यांचा पायी पालखी सोहळा लाखेवाडी गावामधून जात असतो. वैष्णवांचा मेळा हा या पालखी सोहळ्याबरोबर लाखेवाडीतून जात असताना पायी चालणारे वारकरी यांच्यासाठी लाखेवाडीतील लाखेवाडी युवाशक्ती ग्रुप च्या वतीने सर्व वारकरी भाविकांसाठी चहा व अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार युवाशक्ती ग्रुप मधील तरुणांनी चहा आणि अल्पोपहारचे वाटप करून युवकांमध्ये युवा कार्याची शक्ती वैष्णवांच्या सेवेसाठी लावून एक आदर्श निर्माण केला असल्याचे दिसून आले. सर्व युवकांनी मिळून वैष्णव सेवेचे व्रत चालवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या या कार्याचे कौतुकही या ठिकाणी अनेकांच्या कडून होत असल्याचे दिसून आले. सर्व युवकांनी मिळून चहा व अल्पोपहारचे नियोजन केल्याने त्यांच्या एकतेचा संदेश परिसर व तालुक्यामध्ये कौतुकास पात्र ठरला आहे.
या उपक्रमासाठी लाखेवाडीतील युवाशक्ती ग्रुपचे सर्व तरुण आपापल्या परीने सेवा कार्याची सेवा देण्यासाठी उपस्थित होते.

