जिवती (चंद्रपूर ) ◼️किरण घाटे-◼️
मंगळवार दि.12 जुलै रोजी आ. सुधिर मुनगंटीवार यांच्या सूचनेच्या अनुषंगाने भाजयुमो महामंत्री तथा माजी उपसभापती महेश देवकते यांनी जिवती तालुक्यातील विविध गावांत भेट देवून पुरग्रस्त भागांची पाहणी केली .मागील पाच सहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील काल सायंकाळी मौजा आनंदगुडा येथे पावसामुळे घर पडून नुकसान झाले आहे.
त्यात प्रामुख्याने मुके जनावरे मृत होऊन पूर्ण घराचे नुकसान झाले असल्याचे या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी आज सांगितले.सोबतच दि. 12 जुलै 2022 ला दुपारी 4 -00वाजता च्या सुमारास चिखली खू .कामतगुडा, हिमायतनगर, येथील लोकांना भेटून त्यांना त्यांनी मदत कार्य केले. जिवती तालुक्यातील घरांचे व शेत जमीन नुकसानीचे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून आपदग्रस्तांना मदत पुरवावी अशी मागणी त्यांनी केली आहे.तसेच या भागातील रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रयत्न करावे असे देखिल देवकते यांनी म्हटले आहे.

.jpeg)

.jpeg)

