चंद्रपूर▪️ किरण घाटे▪️
चंद्रपूर जिल्ह्यात सतत पांच सहा दिवस पाऊस पडल्यामुळे अनेक भागातील घरांची पडझड झाली.या शिवाय अनेक तालुक्यांतील गावात शेतजमीनीतील पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
दरम्यान आज सोमवार दि.१८जूलैला राजूराचे तहसीलदार हरीश गाडे यांनी तालुक्यातील चिंचोली ,अनुर अंतरगांव ,कवितपेठ ,धानोरा शिंदी या गावांना भेटी देवून तेथील शेतजमीनीतील पीकांच्या नुकसानीची पाहणी केली.या वेळेस त्यांचे सोबत कृषी अधिकारी मकपले, चव्हाण ,मंडळ अधिकारी साळवे उपस्थित होते.

