चंद्रपूर-▪️किरण घाटे- ▪️आज गुरुवार दि.६ जूनला मौजा बेलगाव येथील मृतक अविवाहित तरुणीच्या आईस तहसीलदार वाकलेकर कोरपना यांनी चार लाख रुपयांचा धनादेश दिला.
१५ जून २०२२ रोजी मौजा बेलगाव तहसील कोरपना येथील शेत शिवारात कु.गौरुबाई खंडेराव कोडपे ह्या शेतात काम करीत असताना अचानक वीज पडली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.
उपरोक्त घटने बाबत सदरहू साजाच्या तलाठी कु.रोशनी कोल्हे यांनी वेळीच घटना स्थळाचा मौकापंचनामा करून तो अहवाल तहसील कार्यालयात सादर केला. अवल कारकुन.कु शारदा गावंडे यांनी यांनी उपरोक्त प्रकरण तयार करून ते तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांचे कडे सादर केले.
एका गरीब आदिवासी महिलेस शासनाचे निर्धारित धोरणा नुसार चार लाख रुपयें मंजूर झाल्यावर तो धनादेश मृतकाची आई मोटूंबाई खंडेराव कोडापे यांना तहसीलदार वाकलेकर यांनी आज दिला.या वेळी कोरपनाचे मंडळ अधिकारी आर .पी. पचारे उपस्थित होते.

