श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : शेवगांव तालुक्यातील मौजे बोधेगांव व बालम टाकळी येथील सर्व समाजातील स्वाभिमानी सामाजिक कार्यकर्ते व महीला भगीनींनी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला असल्याने जिल्ह्यभरातील राजकारण ढवळून निघाले आहे.
कारण महाराष्ट्रामध्ये दलबदलून सरकारे स्थापना होत असतांना नेमका विश्वास ठेवावा तरी कोणावर ? अशी स्थिती निर्माण झाली आहे.म्हणून निर्पेक्ष आणी निस्वार्थी तथा स्वाभिमानी असलेले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास प्रकट करत स्वाभिमानी युवकांनी वंचित बहूजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
प्रथम बस स्टॅन्ड चौकातून ढोल ताशाच्यां गजरात फटाके, तौफा वाजवून,भरपावसात वंचित बहूजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणुक काढत बोधेगांवचे ग्रामदैवत बन्नोमा दरगाह येथे फुलांची चादर अर्पण करून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात केली. बोधेगांवचे सामाजिक कार्यकर्ते फारुखभाई सैय्यद व बालमटाकळीचे सामाजिक कार्यकर्ते शेख कमुभाई , ग्राम पंचायत सदस्य केशव चेमटे, ग्राम पंचायत सदस्य बादशहाभाई शेख, मुंगी ग्राम पंचायत सदस्य नितीन घोरपड़े,यांनी कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने वंचित बहूजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला.
सर्व कार्यकर्त्यांचा शाल, पुष्पगुच्छ,फेटे,देवून प्रा. किसन चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच शेवगांव तालुका वंचित बहूजन आघाडी महीला अध्यक्षपदी संगिताताई ढवळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कारही यावेळी करण्यात आला, याप्रसंगी वंचित बहूजन आघाड़ीचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष बन्नूभाई शेख, बोधेगांव शाखा अध्यक्ष धोंडीराम मासाऴकर, शेवगांव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, बाबागिरी, युवा नेते बाळासाहेब भोंगळे, युवा पत्रकार अफताब शेख, दिगंबर बल्लाळ, रविन्द्र बोरूडे, शेख सलीम जिलानी, लक्ष्मण मोरे, जयराम राजपुरे, विष्णु विर,संजय मांतग,बाळू साळवे, सामाजिक कार्यकर्ते मुन्नवर शेख,बबन मिसाळ,व इतर सामाजिक कार्यकर्ते तसेच वंचित बहूजन आघाड़ीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रघूनाथ मिसाळ होते तर या कार्यक्रमाचे सुत्र संचालन शाहुराव खंडागळे यांनी केले आणि सर्व उपस्थितीतांचे आभार धोंडीराम मासाऴकर यांनी व्यक्त केले.कोणत्याही पक्षात ताळमेळ न राहील्याने वंचित बहूजन आघाडीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत जाणार आहे, महाराष्ट्रातील जनतेचा या दलबदलू सत्ता पिसासू सत्ताधाऱ्यांवरील विश्वास उडाला आहे असे प्रा. किसन चव्हाण (सर) यावेळी म्हणाले.

