shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चंद्रपूरात पार पडली मीथर वर्ल्डची कार्यशाळा! कार्यक्रमास अनेकांची उपस्थिती! स्वप्निल देशमुख यांचा पुढाकार!

चंद्रपूर◼️ -किरण घाटे -◼️

काल रविवार दि.३जूलैला दुपारी १२वाजता चंद्रपूरच्या मूल मार्गावरील हाँटेल मयुर येथे मीथर वर्ल्डची एक भव्य कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेचे मुख्य आयोजक च़द्रपूर नगरीचे स्वप्निल देशमुख हे होते. पैश्याला पुढचा विकल्प म्हणजे क्रिप्टो करंसी, ओरिजनल क्रिप्टो करन्सी बाबत जागरूकता व इंटरनेट नंतरचा आविष्कार म्हणजे ब्लाकचैन टेक्नॉलॉजी या बाबत दिल्ली येथील एशिया ट्रेनर अनुरा गेरा यांनी तब्बल दीड तासांपावेतो उपस्थितीतांसमोर आपले विचार मांडून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. 







आयोजित या कार्यक्रमाला विदर्भातील तरुण तरुणी सोबतच चंद्रपूरातील शेकडों पुरुष व महिला सहभागी झाले होते. चार तासांपर्यंत चाललेल्या या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे रितेश जामनकर ,शितल बनसोड, निखिल कोडापे , दिनेश भलावी यांनी देखिल आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या कंपनीत उत्कृष्ट व भरीव कार्य करणाऱ्यां व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यात प्रामुख्याने अर्चना नळे, कुसुम मून, निखिल लांडगे, वैशाली बांगडे, दीप्ती बांगडे, प्रकाश टापरे, आशिष बुट्टे, शैलेंद्र डेकाटे, केसना भसारकर, आशिष बट्टे यांचा समावेश होता.अनुराग गेरा यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित युवा पिढी शेवट पर्यंत खुर्चीला खिळून होती. तरं गर्दीने सभागृह खचाखच भरलेले होते. अनेकांनी या कार्यशाळेची व कार्यक्रमाची सभागृहातुन बाहेर पडल्यानंतर तोंड भरुन स्तुती केली. विशेषता चंद्रपूरचे स्वप्निल देशमुख यांचे या कार्यशाळेसाठी योगदान मोलाचे ठरले. परत एकदा चंद्रपूरात अशी भव्य  कार्यशाळा आयोजित करण्याचा आपला मानस असल्याचे स्वप्निल देशमुख यांनी या प्रतिनिधीशी बोलताना काल चंद्रपूर मुक्कामी सांगितले.

close