shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महिलांच्या शुरतेला सलाम करणाऱ्या पुरस्काराची वर्ल्ड पार्लमेंटकडून घोषणा..!


श्रीरामपूर - वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान व संसद संघ या संपूर्ण विश्वात सामाजिक, पर्यावरण व कायदेविषय कार्यात अग्रगण्य संस्थेकडून आपल्या लौकीकानुसार समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शूर, धाडसी व कणखर महिलांसाठी या वर्षापासून " वर्ल्ड पार्लमेंट ग्रेट इंटरनॅशनल लेडी अवॉर्ड " सुरू करण्याची घोषणा केली आहे.

        वर्ल्ड पार्लमेंटतर्फे आतापर्यंत कला, क्रिडा, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक, चित्रपट, पर्यावरण या क्षेत्रातील प्रतिभावान व्यक्तींसाठी स्वतंत्र पुरस्कार दिले असून " वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड " हा सर्वच क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या गुणवंतासाठी आपला सर्वोच्च पुरस्कारही दरवर्षी दिला जातो. तसेच कोरोना संक्रमण काळात देशभरातील पंधरा हजारांपेक्षा अधिक कोरोना योद्ध्यांना " वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल कोरोना वॉरियर्स अवॉर्ड " देऊन पुढील चांगल्या कार्यासाठी प्रोत्साहीत केले. 
         त्याचबरोबर १ जुलै ते १५ जुलै २०२२ दरम्यान "पर्यावरण पंधरवडा" पाळला जात असून या काळात प्रत्येकाकडू एक झाड लावून घेण्याचा अभिनव उपक्रमही वर्ल्ड पार्लमेंट कडून राबविला जात आहे. त्या बदल्यात संबंधिताना " वर्ल्ड पार्लमेंट पर्यावरणदूत " सन्मान ऑनलाईन पद्धतीने देऊन गौरविले जात आहे
          त्याच अनुषंगाने गुणवान महिलांसाठीही " वर्ल्ड पार्लमेंट ग्रेट इंटरनॅशनल लेडी अवॉर्ड " हा सन्मान दिला जाणार असून यामध्ये मानपत्र, सन्मानचिन्ह व मानाची वर्ल्ड पार्लमेंट मेंबरशिप ( जागतिक संसद सदस्यत्व ) अर्थात आंतरराष्ट्रीय खासदारपद दिले जाते. 
          त्यासाठी विविध क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य करत असलेल्या महिलांनी आपल्या संपूर्ण कार्याची माहिती व वैयक्तीक परिचय नव्याने काढलेल्या पासपोर्ट फोटोसह  wcpashrirampur@gmail.com
 या ईलेमल आयडीवर पाठवायचा असून ९०९६३७२०८२ या क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ.दत्ता विघावे यांनी केले आहे.
close