केंद्राने आणि राज्याने एकमुखी निर्णय घेऊन तमाम जनतेची अपेक्षा पूर्ण करावी
शिर्डी प्रतिनिधी:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच जन्मशताब्दी वर्ष संपत असतानाही ते भारतरत्न पुरस्काराने उपेक्षित राहिले. त्यामुळे अनेक वर्षांपासून असलेली जनसामान्यांची ही मागणी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे फडवणीस सरकार यांनी या बाबत एकमुखी निर्णय घेऊन अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने भारतरत्न देऊन तमाम जनतेची इच्छा पूर्ण करावी. अशी मागणी बहुजन समाजाकडून होत आहे.
फडवणीस सरकारच्या काळातही भारतरत्न देण्यासाठी अनेक वेळा घोषणा करण्यात आल्या त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारच्या काळातही अनेक आमदार खासदार विविध क्षेत्रातील नेते मंडळींनी लेखी निवेदनाद्वारे ही मागणी राज्यसरकार कडे केली.
मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळातही ती मागणी अपूर्णच राहिली आता केंद्रात मोदी सरकार व राज्यात शिंदे फडवणीस सरकार हे एका विचाराचे सरकार असल्याने महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या समाजप्रबोधनासाठी महान कार्य करणारे स्वर्गीय शाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन महाराष्ट्राबरोबरच देशवासीयांची अनेक वर्षाची ही मागणी पूर्ण करावी मागील सरकारच्या काळात जे झाले असेल ते झाले असेल मात्र नव्याने नियुक्त झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे अनेक वेळा महापुरुषांच्या विचारांचा वारसा घेऊन राजकारणाचा गाडा चालवतात.
मग महान समाजसुधारक ज्यांनी परदेशात जाऊन समाजपरिवर्तन केले अशा अण्णाभाऊ ना भारतरत्न देण्यासाठी विलंब का होतो हे यानिमित्ताने जनतेतून मागणी होऊ लागली आहे येणाऱ्या 1 ऑगस्ट 2022 या जयंतीच्या अगोदरच अण्णाभाऊंना भारतरत्न देऊन महाराष्ट्राबरोबरच देश वासियांची ही मागणी पूर्ण करावी अशी मागणी बाळासाहेब बागुल रामभाऊ पिंगळे समीर वीर परशुराम साळवे मजाबापू साळवे नंदू आरणे प्राध्यापक रघुनाथराव खरात सुरेश अडागळे संजय वालेकर दगडू साळवे जगनाथ आव्हाड संतोष भडकवाड यांच्यासह विराट प्रतिष्ठानचे प्रदीप सरोदे निलेश सरोदे वचिंत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे आर.पी.आय चे प्रदीप बनसोडे लोकस्वराज्य आंदोलनाचे अडओकॅटे नितीन पोळ यांच्यासह अनेक संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवनिस केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे*
खासदार सुजय विखे यांना पुढाकार घेण्यास भाग पाडू:-कैलास कोते
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं कार्य महान असून ते कोणत्याही एका विशिष्ट समाजासाठी नव्हते त्यांची परिवर्तनाची लाट ही तमाम महाराष्ट्राच्या व देशवासीयांच्या हितासाठी होती यामुळे अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळवून देण्यासाठी खासदार सुजय विखे यांना समक्ष भेटून केंद्र सरकार ला निर्णय घेण्यासाठी भाग पाडू असे त्यांनी म्हंटले आहे.
अण्णाभाऊ च कार्य राजकारणाच्या पलीकडं असल्यामुळे त्यांनी कोणतेही विशिष्ट पक्षासाठी काम न केल्याने या पुरस्काराची त्वरित अंमलबजावणी होण्यासाठी खासदार शरदचंद्र पवार साहेब यांना पुढाकार घेण्यास भाग पाडू:-निलेश कोते(प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस)
अण्णाभाऊंच्या समाज परिवर्तनाची लाट ही अत्यंत ज्वलंत असल्याने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना भारतरत्न देऊन राज्यासह केंद्राने सम्मानित करावे यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना विनंती करु ही मागणी पूर्ण करण्यास भाग पाडू:-नितीन दिनकर (भाजप नेते)
नामदार आठवले यांनाही साकडं घालू
अनेक वेळा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री नामदार रामदास आठवले यांनी सुद्धा या प्रस्तावाबाबत केंद्र सरकाराचे लक्ष वेधले होते याबाबतही त्यांना साकडं घालू:-प्रदीप बनसोडे(युवा जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे)

.png)
