अहमदनगर । प्रतिनिधी: महाराष्ट्र भर सामाजिक काम करून सुप्रसिद्ध असलेले भगवान कोळेकर यांचा महाराष्ट्र दौरा चालू आहे. यावेळी नगर येथे नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ना उमेद होता जोमाने कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश स्टार प्रचारक भगवानराव कोळेकर यांनी अहमदनगर येथे शिर्डी एक्सप्रेस प्रतिनिधीशी बोलताना केले.
भगवान कोळेकर यांनी उत्तर महाराष्ट्र दौऱ्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरुण भाई गुजराती यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
श्री कोळेकर यांचा दिनांक 5 जुलैपासून उत्तर महाराष्ट्र संपर्क व संवाद दौरा चालू असून जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधला आमच्या प्रतिनिधीशी बोलताना पुढे कोळेकर म्हणाले की महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर या सरकारने अनेक जनहिताचे निर्णय घेतले होते. या निर्णयाला नव्या सरकारकडून रद्द करण्याचे काम चालू आहे तसेच हे सरकार फार काळ टिकणार नसून मध्यावती निवडणुका ना महाराष्ट्र राज्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागावे असे आवाहनही त्यांनी केले. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना आत्ताच बंड करावेसे का वाटले गेल्या अडीच वर्षात सत्तेची पदे भोगत असताना शिवसेना संपवली जात आहे. असे का वाटले नाही याचा ही महाराष्ट्राने विचार करण्याची ही वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.

