shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बंडखोर आमदारांच्या संपत्तीची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे - कोल्हापूरातील जुन्या शिवसैनिकांची मागणी...!

कोल्हापूर । प्रतिनिधी(सुरेश वडर):-
         कोल्हापूर शहर येथील शाहूनगर मध्ये राज्यातील बंडखोर आमदार यांच्या विरोधी घोषणा बाजी करत काल-आज आणि उद्याही उद्वव साहेब आंम्ही तुमच्या सोबतच...!अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले, व गद्दार आमदारांवर कार्यवाही व्हावी अशी घोषणाबाजी झाली. मातोश्री वरून आदेश आल्यावर शिवसैनिक आमदार असो किंवा खासदार यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिक घरावर तुळशी पत्र ठेवून आमदार खासदारांना निवडून आणतो.., तोच आमदार पैशाच्या लोभापोटी आपला इमान गहाण ठेवून पक्षाशी गद्दारी करतो अशी बंडखोरआमदारांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे  साहेब यांचा फलक लावला. 

         उद्धव ठाकरे साहेब यांच्या बरोबर जुने शिवसैनिक आपल्या सोबत आहे. अशा घोषणा दिल्या. उद्धव ठाकरे साहेब "तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है" अशा घोषणाबाजी जुन्या शिवसैनिकांनी दिल्या. या कार्यक्रमाचे नियोजन "हिंद भारतीय जनरल कामगार सेने ' चे जिल्हा अध्यक्ष श्री राजू सांगावकर यांनी केले.

         यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष दिनेश परमार, शाखाप्रमुख अनिरुद्ध सांगावकर, माजी विभाग प्रमुख मारुती पवार, शाखाप्रमुख दिलीप सांगावकर, माजी विभाग प्रमुख सिताराम कुराडे, विभागप्रमुख योगेश शिंदे ,माजी उपशहर प्रमुख उदय जाधव, माजी उपशहर प्रमुख तात्या दळवी, नेताजी पाटील ,बाळासाहेब नलवडे, मारुती सांगावकर, तायाप्पा कांदेकर, शिवाजी शिंदे, गंगाराम धोत्रे ,मामा फडतरे असे जुने आजी-माजी शिवसैनिक उपस्थित होते.
close