शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक १२ जुलै २०२२
चार गावठी कट्टयांसह सराईत गुन्हेगार जेरबंद ,एलसीबीची कारवाई : सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त..!!
अहमदनगर : विक्री करण्याच्या उद्देशाने चार गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे बेकायदेशिररित्या कब्जात बाळगणार्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. महेश काशिनाथ काळे (वय 26 रा. जामगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून चार कट्टे, आठ काडतुसे, दुचाकी, मोबाईल व सॅक असा दोन लाख 24 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेंडी (ता. नगर) शिवारात पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलीस अंमलदार संदीप पवार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महेश काळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना अहमदनगर जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. एक इसम शेंडी बायपास, पांढरीपुल परिसरात गावठी कट्टे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती.
त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, संदीप पवार, सुनील चव्हाण, मनोज गोसावी, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, ज्ञानेश्वर शिंदे, आकाश काळे, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. पथकाने शेंडी बायपास, पांढरीपुल परिसरात सापळा लावला. दुचाकीवरून आलेल्या संशयीत इसमाला पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव महेश काशिनाथ काळे असे सांगितले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता चार गावठी कट्टे, आठ काडतुसे मिळून आली. पोलिसांनी ती जप्त केली आहे. अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

