नगर । प्रतिनिधी :-
सविस्तर माहिती अशी आहे की महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या खोसपुरी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी, युवकांचे प्रेरणास्थान असनारे श्री. अविनाश अर्जुन आव्हाड या 32 वर्षीय युवकाची बिनविरोध निवड करण्यात आली. या तरुण युवा नेतृत्वाची सरपंच पदी नियुक्ती केल्यामुळे गावातील सर्व तरुण युवकांनी जेसीबीच्या सहाय्याने गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला.
या निवडीसाठी खोसपुरी गावचे माजी सरपंच सन्माननीय श्री बाबाजी शेख, श्री मुबारक भाई पठाण, अर्जुनजी आव्हाड, श्री सत्तारभाई शेख, ज्ञानदेवरावजी भिसे, श्री प्रवीणजी आव्हाड त्याचबरोबर माजी उपसरपंच भारतजी दरेकर, अल्ताफभाई बेग, श्री गोविंदजी दरेकर सर, प्रल्हादजी भिसे यांच्यासह गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

