चंद्रपूर -▪️किरण घाटे▪️
शासनस्तरावरून दिव्यांग व्यक्तींना सर्व सोयी सुविधा उपलब्ध होत असते . त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी शासनाकडून विविध योजनेचा लाभ देण्यात येत असते परंतु अनेक शासकीय कार्यालयात त्यांची कामे वेळेवर होत नाही व त्यांना सौजन्याने वागणूक देण्यांत येत नाही.
त्यांना ती सौजन्य पूर्वक वागणूक देण्यात यावी व त्यांचे कामे वेळेवर शासकीय कार्यालयातून व्हावी अशी मागणी भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया दिव्यांग विभागाचे जिल्हाध्यक्ष दिलीप मिश्रा यांनी आज बुधवार दि.२०जूलैला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांचे कडे एका लेखी निवेदनातून केली आहे.


