shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

...अन्यथा महिलांना सरपण गोळा करण्याची परवानगी द्या - संगीता अमृतकर यांची मागणी..!



चंद्रपूर : ▪️ किरण घाटे ▪️
मोदी सरकारने गृहिणींना प्रत्येक वेळेस गॅस सिलेंडर दरवाढीची भेट दिली आहे. त्यामुळे गृहिणीचे बजेट पूर्णता कोलमडले आहे. आता गृहिणींना जंगलात जाऊन सरपण गोळा करण्याची परवानगी देऊन या महागाईच्या भस्मासुरापासून सुटका करण्याची मागणी शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष संगीत अमृतकर यांनी केली आहे. 

 
चंद्रपूर येथील गांधी चौक येथे शुक्रवारला शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष संगीत अमृतकर यांच्या नेतुत्वात महिलांनी गॅस दरवाढी विरोधात मोदी सरकार विरुद्ध आंदोलन केले. त्या वेळी त्या बोलत होत्या. 

घरगुती गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात शहर महिला कांग्रेसचे आंदोलन भाजपा सरकारने घरगुती गॅस चे दरात पुन्हा 50 रूपयांनी वाढ करत सामान्य जनतेचे कंबरड़े मोडले आहे. या  दरवाढी विरोधात महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या सुचनेनुसार शहर महिला कांग्रेस तर्फे गांधी चौक चंद्रपुर येथे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाच्या वेळी शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, माजी महिला जिल्हाध्यक्षा चित्रा डांगे, माजी नगरसेविका विणा खनके,  अनुसूचित विभाग प्रदेश उपाध्यक्षा अश्विनी खोब्रागडे, अनु दहेगावकर, हर्षा चंदेकर, चंदा वैरागड़े, पूजा आहूजा , सुनंदा धोबे, राधा बोहरा, शितल कातकर ,   शालिनी भगत, पप्पू सिद्धीकी,  नवशाद शेख  आदींची उपस्थिती होती.......
close