shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गोल्डन मेमोरी आयजेईएसच्या माजी विद्यार्थ्यांनी केला एफि डेव्हिड व मेरी डेव्हिड यांचा सत्कार!



▪️सहजं सुचलंच्या मार्गदर्शिका अलका सदावर्ते यांचा ही झाला सन्मान!   चंद्रपूर-◼️किरण घाटे-◼️राजूरा येथील गोल्डन मेमोरी आय जे ई एस च्या विद्यार्थ्यांनी एका अनोख्या सोहळ्याचे आयोजन केले होते . दरम्यान या संस्थेचे संस्थापक एफि डेव्हिड आणि मेरी डेव्हिड यांच्या कार्याची आठवण ठेवून त्यांचा व १९८५च्या कालावधीत कार्य केलेल्या शिक्षकांचा सन्मान करून त्यांना एक भेट वस्तु या प्रसंगी दिली .



याच कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या जेष्ठ मार्गदर्शिका राजूरा निवासी तथा सामाजिक कार्यकर्त्या अलका दिलीप सदावर्ते यांचा ही शाल,श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला .याच कार्यक्रमाच्या निमित्ताने अन्य शिक्षकांचा देखिल सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाच्या आरंभी मधुर व गोड आवाजाच्या  गायीका अलका सदावर्ते यांनी "हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे " या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात केली   उपस्थित मान्यवरांनी प्रार्थना गिताची मुक्तकंठाने या वेळी  प्रशंसा केली.

आयोजित या सोहळ्याला ७५ पेक्षा अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते .या शिवाय या कार्यक्रमाला शिक्षकांचीही उपस्थिती लाभली होती .

◼️राजूरा नगरीच्या नक्षत्र हॉल मध्ये झालेला हा अनोखा कार्यक्रम उपस्थितीतांच्या सदैव स्मरणात राहील असाच झाला होता.विशेष उल्लेखनीय बाब अशी की सन १९८५ते १९८९पर्यंत इन्फंट जिजस मध्ये अल्का दिलीप सदावर्ते यांनी शिक्षिका म्हणून‌ धुरा सांभाळली होती.
close