shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नागरिक सेवा मानधनात प्रतिमाह ५ हजार रू. वाढ करावी- संजय झांबरे

राहुरी । प्रतिनिधी: दिव्यांग, ( अंध - अपंग ), निराधार, जेष्ठ नागरिक, घटस्फोटित, विधवा, परितक्त्या यांच्या मानधन (डोल) मध्ये प्रतिमाह वाढ (रू. ५,०००/-) करून न्याय मिळवून द्यावा. या मागणीचे निवेदन राहुरी तालुका प्रमुख, शिवसेना, अपंग सहाय्य सेना, राहुरी तालुका अध्यक्ष संजय शामराव झांबरे यांनी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना मेल पाठवून  केला आहे.

       

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सध्याच्या काळातील वाढती महागाई लक्षात घेता महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग, (अंध - अपंग), निराधार, जेष्ठ नागरिक, घटस्फोटित, विधवा, परितक्त्या यांच्या मानधन (डोल) मध्ये वाढ प्रतिमाह (रू. ५,०००/-) करून न्याय मिळवून द्यावा. या सर्व बंधु भगिनींचा १०००/- रुपये पेन्शन मध्ये उदरनिर्वाह होत नाही. तरी आपण दिव्यांगांच्या उदर निर्वाहाचा विचार करून दिव्यांगांना प्रती माह ५०००/- रुपये पेन्शन वाढ करावी. दिव्यांग, (अंध - अपंग), निराधार, जेष्ठ नागरिक, घटस्फोटित, विधवा, परितक्त्या यांच्या मानधन (डोल) मानधनामध्ये प्रतिमाही वाढ (रू. ५,०००/-) करून न्याय मिळवून देण्यात यावा. हक्क नव्हे तर केवळ मानवतेच्या दृष्टीकोनातून सहानुभूती पूर्वक आमच्या अर्जाचा विचार करून योग्य ती कार्यवाही करावी आणि वर नमुद केलेल्या सर्वांना योग्य तो न्याय द्यावा.

          अशी मागणी संजय शामराव झांबरे राहुरी तालुका प्रमुख, शिवसेना, अपंग सहाय्य सेना, व सुनिता संजय झांबरे राहुरी तालुका, महिला आघाडी प्रमुख, शिवसेना अपंग सहाय्य सेना राहुरी यांनी केली आहे.



close