shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कत्तलीसाठी चालविलेल्या गायींची सुटका, लोणीच्या दोघांविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..!!


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक १२ जुलै २०२२

कत्तलीसाठी चालविलेल्या गायींची सुटका, लोणीच्या दोघांविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..!!

अहमदनगर : पिकअपमध्ये डांबून कत्तलीसाठी चालवलेल्या तीन जर्सी गायींची सुटका करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले. अहमदनगर-कल्याण रस्त्यावरील बायपास चौफुला येथे शनिवारी सायंकाळी पोलिसांनी ही कारवाई केली. एक पिकअप, तीन गायी असा तीन लाख 45 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अंमलदार तान्हाजी पवार यांच्या फिर्यादीवरून इसाक बनेमिया शेख (वय 42) व मनोज आप्पसाहेब घोगरे (वय 38 दोघे रा. लोणी खुर्द ता. राहाता) यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिकअपमध्ये गोवंशीय जनावरांची वाहतुक केली जात असून तो पिकअप अहमदनगर-कल्याण रस्त्यावरील वैष्णवी हॉटेलसमोर थांबला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. निरीक्षक शिंदे यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदार पवार, योगेश भिंगारदिवे, अमोल गाडे, दीपक रोहकले, खताडे यांना कारवाईचे आदेश दिले.

पथकाने सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अहमदनगर-कल्याण रस्त्यावरील केडगाव चौफुला येथील वैष्णवी हॉटेलसमोर उभा असलेल्या पिकअप ताब्यात घेऊन पाहणी केली असता यामध्ये तीन जर्सी गायी मिळून आल्या. पोलिसांनी पिकअप, गायीसह दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600




close